Type Here to Get Search Results !

बालवीर विद्यानिकेतन मध्ये दुहेरी कार्यक्रम संपन्न

बालवीर विद्यानिकेतन मध्ये दुहेरी कार्यक्रम संपन्न

बेळगुंदी :  बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा दिन व विज्ञान दिन असा दुहेरी कार्यक्रम संयुक्तरित्या साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संयोजक श्री  शंकर चौगुले  होते. प्रारंभी इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी  विज्ञान गीत सादर केले त्यानंतर प्रमुख अतिथी धनश्री सांगावकर यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तर  कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला प्रमुख अतिथी नीता  यल्लारी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाबद्दल व राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल भाषणे सादर केली. 

 इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांची वेशभूषा सादर केली त्यानंतर प्रमुख अतिथी निता यल्लारी यांनी भाषेमुळे माणसाचा व्यक्तिमत्व विकास होतो हे भाषेचे मुख्य वैशिष्ट्य असून भाषेमुळेच ओळख व संवाद होण्यासाठी आपल्याला मदत होते असे उद्गार काढले त्यानंतर दुस-या प्रमुख अतिथी धनश्री सांगावकर यांनी विज्ञान दिनाबद्दल डॉ. सी. व्ही. रमण व मिसाईल मॅन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल उत्तम असे मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ शिक्षक जाधव सर यांनी  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन  करताना असंच का झालं ते तसच का झालं हे शोधण्यासाठी विज्ञान प्रवृत्त करतं आणि त्यासाठी आपण सतत प्रयोग करत राहिलं पाहिजे असे सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पंचवीसहून अधिक प्रयोगांचे सादरीकरण केले त्यामध्ये प्रामुख्याने  ज्वालामुखी ,चंद्रयान थ्री, पवनचक्की, सोलार, रोबोट, मानवी फुफ्फुस, डोअर बेल, मिनी साउंड असे एकापेक्षा एक सुंदर प्रयोग सादर केले यावेळी व्यासपीठावर प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील ज्येष्ठ शिक्षक सुनील जाधव प्रकाश मेटकर सिद्धेश्वर तुर्केवाडकर रश्मी पाटील यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ऋषभ सुतार या विद्यार्थ्याने केले व आभार सृष्टी पाटील या विद्यार्थिनीने मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या