Type Here to Get Search Results !

शेतीमालासाठी नाबार्ड अंतर्गत शीतगृह उभारले जाणार ; खासदार जगदीश शेट्टर

शेतीमालासाठी नाबार्ड अंतर्गत शीतगृह उभारले जाणार ; खासदार जगदीश शेट्टर

बेळगावी :  नाबार्डने  2024-25 ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (RIDF) योजनेंतर्गत बेळगावी कृषी उत्पन्न बाजारासाठी दोन हजार मेट्रिक टन क्षमतेच्या  शितगृहासाठी 9.025 कोटी निधी मंजूर केला आहे. अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी ही माहिती दिली. एका बैठकीत बोलताना ते म्हणाले, "कोल्ड स्टोरेज सुविधा नसल्यामुळे सुमारे 25-30% शेती आणि बागायती उत्पादन वाया जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते." नवीन सुविधेमुळे बटाटे, मिरची, भाज्या, कडधान्ये आणि फळे यासारख्या नाशवंत वस्तू दीर्घकाळ टिकवून ठेवल्या जातील. यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढवताना गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य राखण्यास मदत होईल. 27 सप्टेंबर रोजी बँकर्सच्या बैठकीत खासदारांनी दिलेल्या निर्देशानुसार, नाबार्डच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे आवाहन करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या