प्रयागराज येथील चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला असून निश्चित आकडा अजून समजू शकला नाही. परंतु मृत्यू झालेल्या भाविकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यास बेळगाव येथून बरेच भाविक गेले असून, या कुंभमेळ्यात बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू झाला असून, ज्योती हत्तरपाठ (वय 50 वर्ष) आणि त्यांची मुलगी मेघा हत्तरपाठ राहणार वडगाव बेळगाव यांचा मृत्यू झाला आहे. तर शेट्टी गल्ली बेळगाव येथील अरुण खोरपाडे आणि शिवाजी नगर येथील महादेवी हनुमंत भवनूर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज येथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष जिल्हाधिकारी म्हणून हर्षल भोयर यांची नियुक्ती करण्यात आली असून, एक पोलीस अधिकारी आणि विशेष जिल्हाधिकारी हर्षल भोयर हे प्रयागराजला रवाना होत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या