जेडीएसचे नेते फैजुल्ला माडीवाले यांचे निधन
बेळगाव - क्लब रोड येथील रहिवासी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे निकटवर्तीय आणि बेळगाव जेडीएसचे नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (ता. २१) सायंकाळी निधन झाले. फैजुल्ला माडीवाले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरले आणि त्यांचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या