मध्यवर्ती समितीकडून उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव, ता. ८ : सीमाभागात कानडी संघटनाच्या वतीने मराठी भाषिकांच्या फलकावर वाढते कन्नड सक्तीकरणा विरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निवेदन देण्यात येणार आहे. सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांनी मंगळवारी (ता.९) सकाळी ११.०० वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहरासहश प्रत्येक गावात जाणून बुजून कन्नड सक्ती केली जात आहे. शासनाने हा वरवंटा फिरविण्यास अनेक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या कन्नड सक्तीला सीमाभागातील मराठी भाषिकांकडून विरोध केला जात आहे. शहरातील कन्नड संघटनाच्या पदाधिकाऱ्यांकडून कन्नड सक्तीसाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून दबाव टाकला जात आहे. परिणाम मराठी भाषिकांकडून लोकशाही मार्गाने या सक्तीला विरोध सातत्याने केला जात आहे. मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा मराठी भाषेवरील अन्याय अत्याचार विरोधात लढण्यासाठी आपला मराठी बाणा कर्नाटक सरकारला दाखविण्यास तयार झाले आहेत. मंगळवारी (ता.९)
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व चिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या