Type Here to Get Search Results !

मराठी विद्यानिकेतन शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

 मराठी विद्यानिकेतन शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा



 बेळगाव, ता. २६ : मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक श्री. बी.बी शिंदे यांचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे बी.बी .शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यानंतर राष्ट्रगीत व झेंडा गीत सादर करण्यात आले




 यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी झेंड्याला मानवंदना दिली. संगीत विभागातर्फे समूहगीते सादर करण्यात आली. बालवाडीचे विद्यार्थी पार्थ शिंदोळकर ,हर्षदा गुंजीकर, क्षितीज सांबरेकर ,समर्थ चौगुले, स्वरांजली गुंजीकर ,प्रेम गावडे यांनी आपले विचार व्यक्त केले.माध्यमिक विभागाचे विद्यार्थी प्रतिज्ञा कुंभार व स्वरा पाटील या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. भरतेश ट्रस्ट आयोजित समूह गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गांधी तत्वे समजण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशन गांधीतीर्थ जळगाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गांधी संस्कार परीक्षा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा  गौरव सोहळा सहशिक्षक प्रसाद सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार  पाडला.

लोकशाही म्हणजे केवळ संसदीय सरकार नव्हे तर लोकशाही म्हणजे सहजीवन. लोकशाहीच्या विकासासाठी आपण काय करू शकतो ?याचा विचार व्हावा. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे.. जोपर्यंत आपल्या देशातील जनता साक्षर, विचारशील, शहाणी ,ज्ञानी होणार नाही तोपर्यंत लोकशाहीचा विकास होणार नाही . ज्या दिवशी ग्रंथालयात रांगा लागतील त्या दिवशी भारत महासत्ता बनेल.  वाचन ,चिंतन ,विचार करायला शिका.प्रथम आपण आपल्या देशावर प्रेम केले पाहिजे. प्रत्येकाने आपले काम हे प्रामाणिकपणे केले तर त्यामध्ये देशप्रेमाची मूल्ये आपण जपलीच! अशा शब्दात प्रमुख पाहुणे बी.बी .शिंदे यांनी प्रजासत्ताक दिन -आजचा , कालचा व भविष्याचा कथन केला. क्रीडा शिक्षक महेश हगीदळे,दत्ता पाटील , पूजा संताजी, श्रीधर बेन्नाळकर यांच्या मार्गदर्शनाने कराटे, शारीरिक कवायती यांचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. 

शिक्षण संयोजिका निला आपटे ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत ,बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर ,विद्यार्थी प्रतिनिधी-पंतप्रधान प्रियल चौगुले शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली हळदणकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या