Type Here to Get Search Results !

19 वे येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोजी

 19 वे  येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोजी



येळळूर ता. 30 :  दरवर्षी  प्रमाणे  यावर्षीही 19 वे येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी 2024 रोजी भरविण्याचा  निर्णय घेण्यात आला. साहित्य संघाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे  होते.


 बैठकीच्या सुरुवातीला प्रा. सी एम गोरल यांनी उपस्थित साहित्य संघाच्या सदस्यांचे स्वागत केले.  बैठक बोलाविण्याचा उद्देश स्पष्ट केला. साहित्य संघाचे सचिव डॉक्टर तानाजी पावले यांनी गतवर्षीचा जमाखर्चाचे वाचन केले. संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे म्हणाले, साहित्य परंपरा अखंडित ठेवण्याच्या हेतूने यावर्षीही 19 वे येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 4) फेब्रुवारी 2024 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे  यावर्षीही साहित्य संमेलन  उत्साहात यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले.  प्रति वर्षाप्रमाणे संमेलन  पाच सत्रात होणार आहे. प्रतिवर्षी ग्रंथ दिंडीला  उशीर होत असल्याने  यावर्षी ग्रंथदिंडीचा मार्ग कमी करण्याचा निर्णय  बैठकीत घेण्यात आला.  ग्रंथ दिंडीची सुरुवात ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी   मंदिरापासून सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले. ग्रंथ दिंडीचा मार्ग कमी झाल्यामुळे  पाचही सत्राना  पुरेपूर वेळ मिळणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दिग्गज साहित्यिकांना आमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी.एम. गोरल, सचिव  डॉ तानाजी पावले, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर, सुभाष मजुकर व  अनेक  साहित्यप्रेमी उपस्थित होते. प्रा. सी.एम. गोरल यांनी आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या