'संत मीरा'तर्फे ''दीपावली मिलन'' कार्यक्रम उत्साहात
बेळगाव, ता. २२ : अनगोळ येथील संतमीरा इंग्लिश मीडियम हायर प्रायमरी स्कूल या शाळेमध्ये 'दीपावली मिलन' हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेच्या आवारामध्ये आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सुधारणा समितीचे (एसडीएमसी) अध्यक्ष डॉ. विजय गोवेकर, सेक्रेटरी देवीप्रसाद कुलकर्णी, खजिनदार रमेश लदड यांच्यासह अन्य सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील उपस्थित होत्या. दीपावली मिलन कार्यक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सदर खेळांमध्ये शाळेचे विद्यार्थी, पालक आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग दर्शवला होता. याव्यतिरिक्त शाळेच्या मैदानावर आकर्षक रांगोळी आणि फुलांची सजावट करण्याबरोबरच दिवे लावून शाळा व शाळेचे आवार उजळविण्यात आले. त्याचप्रमाणे आकाश कंदील सोडून शाळा परिसर दीपोमय करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात शाळा सुधारणा समितीचे सदस्य रामनाथ नाईक यांनी दीपावली सणाचे महत्त्व सांगितले. सांस्कृतिक आणि सामाजिक एकता टिकवणे हा संत मीरा शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दीपावली मिलन कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात पालकांनी स्वयंस्फूर्तीने फराळ आणून त्याचे एकमेकांना वाटप करत सणाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका तनुजा गावडा व प्रियांका तलवार यांनी केले. शेवटी एसडीएमसी अध्यक्ष डॉ. विजय गोवेकर यांनी सर्वांचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या