Type Here to Get Search Results !

महिलांनी संगीतामध्ये रुची ठेवावी ; खासदार मंगला अंगडी

महिलांनी संगीतामध्ये रुची ठेवावी 

: खासदार मंगला अंगडी



बेळगाव, ता. २७ : लिंगायत महिला समाजाच्या वतीने वाद्य संगीत ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी वारणा बाल वाद्यवृंदच्या कलाकारांनी, विविध वाद्यांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


बेळगावच्या जेएनएमसी मेडिकल कॉलेजच्या प्रांगणातील, एच. बी. राजशेखर सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला , खा. मंगला अंगडी, तसेच आशाताई कोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच नगारा वाजवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खा. मंगला अंगडी यांनी उपस्थितांना जीवनातील वाद्य संगीताचे महत्व सांगितले. आणि त्यांनी लिंगायत महिला समाज संघाच्या विविध कार्याची प्रशंसा केली.
यानंतर वारणा बाल वाद्य वृंदच्या बाल कलाकारांनी बासरी, ड्रम, गिटार अशी विविध वाद्ये वाजवून उपस्थितांना मंत्रमूढग केले . यावेळी, अनुराधा बागी, नयना गिरीगौडर, कावेरी किलारी, तसेच लिंगायत महिला समाजच्या पदाधिकारी आणि सदस्या उपस्थित होत्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या