Type Here to Get Search Results !

महिला दिव्यांग बास्केटबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेतब यश

 महिला दिव्यांग बास्केटबॉलपटूंची राष्ट्रीय स्पर्धेतब यश 



बेळगाव, ता. २७ : बेळगावच्या सात दिव्यांग महिला बास्केटबॉलपटूंनी राजनंदगाव (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या 7 व्या राष्ट्रीय पातळीवरील व्हीलचेअर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी नोंदविली आहे.


राष्ट्रीय स्पर्धेत चमकलेल्या बेळगावच्या दिव्यांग व्हीलचेअर बास्केटबॉलपटूंची नावे लक्ष्मी रायप्पा रायण्णावर (अलदकट्टी, केएम सौदंती, ता. यरगट्टी), ललिता गवस (बैलूर, ता. खानापूर), महादेवी यड्रावी (धर्मट्टी, ता. गोकाक), आरती पवार (अनगोळ, बेळगाव), मायवा सनिंगनावर (तवलगिरी, सौंदत्ती), मनीषा होंगल (रामतीर्थनगर, बेळगाव) आणि रिजवाना जमादार (वीरभद्रनगर, बेळगाव) अशी आहेत. या सातही खेळाडूंनी कर्नाटक राज्याच्या संघाला 7 व्या राष्ट्रीय पातळीवरील व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. हे उल्लेखनीय यश मिळवताना उपरोक्त 7 जणींनी आपल्या अपवादात्मक कौशल्याचे प्रदर्शन करून स्पर्धेच्या ठिकाणी सर्वांची वाहव्वा मिळवली. राष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल वरील खेळाडूंचे स्थानिक पातळीवरील क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या