बेळगुंदीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला
बेळगाव ता. २३ : बेळगुंदी येथील मंगळवारपासून बेपत्ता असलेले गिल्बर्ट डायस (56) यांनी विष प्राशन करून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या हत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.२४ ) उघडकीला आली. पाताळगडीच्या सहाय्याने मृत्यू देह बाहेर काढण्यात आला.
किशोर पाटील यांच्या शेतातील विहिरीच्या शेजारी चप्पल पडल्याचे गावातील एका व्यक्तिच्या निदर्शनाला आले. गावातील लोकानी चप्पल नातेवाईकांना दाखवल्यानंतर ओळख पटली त्यानंतर विहिरीत शोध म्हणून सुरू करण्यात आली. प्रथमतः विहिरीत कॅमेरा सोडून खरोखर मृत्यू देह आहे का? याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कारवाई करून दुपारी दोनच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
या प्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. गुलबेट डायस हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शुक्रवारी (ता.24) बेळगुंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
-------------
रेस्क्यू टीमचे सहकार्य, दोन तासानंतर देह बाहेर काढण्यास यश
विहिरीतील मृत्यू देह बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यावेळी बेळगाव मधील रेस्क्यू टीमचे सहकार्य लाभले विहिरीत उतरून मृत्यू देह बाहेर काढण्यात आला.आहे

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या