भातकांडेज केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा गौरव
बेळगाव, ता. २६ : येथील गजाननराव भातकांडे शिक्षण संस्थेच्या भातकांडेज केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल या शाळेला सिंघानिया एज्युकेशन कॉन्क्लेव्ह यांच्याकडून 'सर्वोत्तम शैक्षणिक उत्कृष्टता' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील फेरफील्ड बाय मेरीयट येथे गेल्या शुक्रवारी (ता.२४) आयोजित शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात भातकांडेज केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शाझिया जमादार यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. शाळेच्या शिक्षकांची समर्पित वृत्ती आणि विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी केलेले अथक प्रयत्न याचे हे फलित असून पालकांनी देखील यासाठी सहकार्य केल्याबद्दल संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत. 'सर्वोत्तम शैक्षणिक उत्कृष्टता' पुरस्काराबद्दल केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल स्कूल चेअरमन मिलिंद भातकांडे सचिव मधुरा भातकांडे आदी व्यवस्थापनासह मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाचे शिक्षण क्षेत्रात अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या